ग्रामपंचायत कांचनगाव

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

कांचनगाव हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात वसलेले एक मध्यम आकाराचे गाव आहे. या ग्रामपंचायतीची स्थापना दिनांक २१ जून १९६३ रोजी झाली. ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री. नितीन एकनाथ गागोडे असून ग्रामपंचायत अधिकारी श्री. फुलचंद रघुनाथ वाघचौरे आहेत.

२०११ च्या जनगणनेनुसार कांचनगाव गावाची एकूण लोकसंख्या २५४४ आहे, त्यापैकी १२४३ पुरुष आणि १३०१ महिला आहेत. गावातील लहान मुलांची (०-५ वयोगटातील) संख्या १६० आहे. गावाचा एकूण साक्षरता दर ६०.४२% असून, पुरुष साक्षरता ७०.४८% आणि महिला साक्षरता ५१.७१% आहे. अनुसूचित जातींची संख्या ३१४, अनुसूचित जमातींची संख्या ५४९, तर ओबीसी लोकसंख्या १६८१ आहे.

कांचनगाव २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
माहितीचा प्रकारतपशील
ग्रामपंचायत नावकांचनगाव
तालुका / जिल्हाता. इगतपुरी, जि. नाशिक
स्थापना दिनांक२१/०६/१९६३
ईमेल आयडीgpkanchangaon01@gmail.com
प्रशासकश्री. नितीन एकनाथ गागोडे
ग्रामपंचायत अधिकारीश्री. फुलचंद रघुनाथ वाघचौरे
समाविष्ट वाड्या / वस्त्याअवचितवाडी, कोल्हाटवाडी, ठाकूरवाडी
एकूण भौगोलिक क्षेत्र७९०.४५ हेक्टर (बागायत – ३९.०९ हे., जिरायत – ७५१.८६ हे.)
एकूण लोकसंख्या२५४४ (पुरुष – १२४३, महिला – १३०१)
कुटुंब संख्या५८७
खातेदार संख्या६८९
अनुसूचित जाती३१४
अनुसूचित जमाती५४९
ओबीसी लोकसंख्या१६८१
साक्षरता दरएकूण – ६०.४२%, पुरुष – ७०.४८%, महिला – ५१.७१%
मतदार संख्याएकूण – २०३० (पुरुष – १०६७, महिला – ९६३)
पाणीपुरवठा धारक४४३ (मार्च २०२५ पर्यंत)
पाणी पुरवठा योजना१००,००० लिटर टाकी व वैयक्तिक नळयोजना कार्यरत
शाळाजि.प. प्राथमिक शाळा (१ ली ते ७ वी), अवचितवाडी शाळा (१ ली ते ४ थी)
अंगणवाडी केंद्रे५ केंद्रे कार्यरत (पूर्णवेळ कार्यकर्ती व मदतनिसांसह)
मुख्य व्यवसायशेती – भात व भाजीपाला लागवड
सांडपाणी व्यवस्थाभूमिगत गटार – ३०० मिमी: २१३६ मीटर, ४५० मिमी: १२३८ मीटर
वीज व दिवाबत्तीएकूण पोल – ९८
वृक्षलागवडरस्त्यालगत, मोकळ्या जागेत व शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षलागवड केली
गावाचा नकाशा लिंककांचनगाव नकाशा पाहा

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी